Latest News

श्री शामगीर शिक्षण संस्था शिवणी (कोतल)

मनोगत

श्री शामगीर शिक्षण संस्थेने 'शिस्त, ज्ञान, चारित्र्य हे ब्रीद स्वीकारले हेच ब्रीद उराशी बाळगून, संस्थेचे कार्याध्यक्ष या नात्याने निरंतर पणे ज्ञानदान करण्याचे कार्य आमच्या जय भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दापका या शाळेच्या माध्यमातून केले जाते.

भारत हा जगातील युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. तरूणांचा लोकशाही देश म्हणून ही औळखला जातो. त्यामुळे स्वाना चांगले क्षमतापुर्ण शिक्षण देणे या बरोबरच गुणवत्ता पुर्ण शिक्षण पुरवीण्याची संधी देणे हे आमचे कर्तव्य समजतो. विद्यार्थी केंद्रीभूत मानून त्यांना वात्सल्यपुर्ण वागणूक देणे शिकण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा, उपयेगी संसाधने उपलब्ध करून दिले जातात.

मुलांनी केवळ शिकणेच महत्वाचे ठरणार नाही तर कसे शिकायचे हे शिकणे जास्त महत्वाचे ठरणार आहे. शिक्षणामुळे चारित्र् घडले पाहिजे आणि ज्या योग्य शिकणारे नितीवान तर्कशुध्द सहानुभूतीशील आणि सहदय बनतील आणि त्याचवेळी ते विद्यार्थी लाभदायी आणि समाधानकारक रोजगार मिळवण्यासाठी तयार होतील.

स्पर्थेच्या युगात विद्याथ्यापूढ़े अनेक आव्हाणे आहेत अन् भविष्यातही येतील या आव्हानांना पेलण्याचे साम्थ्थ म्हणून आमच्या संस्थेमध्ये व्यवसायीक, विज्ञान-तंत्रज्ञानमुक्त शिक्षण मिळावे म्हणून डी-फार्मसी/ बी-फार्मसी बी. एस्सी अशा लोकउपयोगी रोजगारभिमुक शिक्षणाची संस्थेने कास धरलेली आहे.

शैक्षणिक जीवनात विद्याथ्याचि एक वेगळे भावविश्व असते. त्यांच्या स्वप्नांचे एक छोटेसे आकाश असते. स्वप्न पहाण, ती फुलवण, सत्यात उतरवण या सर्वासाठी स्वत:च्या जीवनात एक शिस्त लावून घ्यावी लागते. हे सर्व शिक्षणातूनच साध्य करता येईल. कारण शिक्षण माणसाला आतून फुलवते, शिक्षणातून माणसाची समज वाढते.जगण्याची नवी उमेद निर्माण होते. आवहानांना पेलण्याचे सामथ्थ मिळते आणि 'निर्णय क्षमता' प्राप्त होते.

विद्याथ्याचा सर्वागीण विकास करणे या सर्व गोष्टी डोळ्या समोर ठेवून आमचे जय भारत विद्यालय वाटचाल करत आहे.